‘त्या’ पत्रातील आरोपांची चौकशी करा ; माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची मागणी

‘त्या’ पत्रातील आरोपांची चौकशी करा माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची मागणी पिंपरी : पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत पिंपरी चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याबाबतीत समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या ‘त्या’ पत्रातील आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी बोलताना चाबुकस्वार म्हणाले, कृष्णप्रकाश यांनी आपल्या आयुक्तदाच्या कारकिर्दीत या शहरात अनेक बेकायदेशीर प्रकार केले असून या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. अशा आशयाचे उत्तर आपणाला प्राप्त झाल्याची माहिती यावेळी चाबुकस्वार यांनी दिली. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या सर्व प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश पोलिस खात्याच्या वरिष्ठानां तात्काळ दिले आहेत, असेही चाबुकस्वार यावेळी म्हणाले. 20 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवडचे तेव्हाचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश हे परदेशी असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. पोलिस आयुक्तपदाचा पदभार अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे असतानाच या जागी बदलून आलेले नवे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपला पदभार स्वीकारला त्यामुळे कृष्णप्रकाश यांना बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचा कोणताही अवसर मिळाला नव्हता. कृष्णप्रकाश यांची बदली झाल्यानंतर त्यांचे वाचक म्हणून काम करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी लिहिले आहे असे भासणारे एक चार पानी पत्र समाज माध्यमांवर प्रसारीत झाले होते. या पत्रामध्ये कृष्णप्रकाश, शहरातील काही कथित राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यावार अत्यंत खळबळजनक आरोप करण्यात आले होेते. हे पत्र समाज माध्यमांवर फिरू लागल्यानंतर दुसर्‍याच दिवशी डॉ. डोंगरे यांनी ते आपण लिहिलेले नाही असा खुलासा पोलिस आयुक्तांकडे करत एका निवेदनाव्दारे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही महाराष्ट्र शासनाकडे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने त्याची चौकशी करावी अशी मागणी केली. त्या पाठोपाठ आता माजी आमदार चाबुकस्वार यांनीही ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकी कोणती कलाटणी घेणार? असा प्रश्न निर्माण?झाला आहे.
‘त्या’ पत्रातील आरोपांची चौकशी करा ; माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची मागणी ‘त्या’ पत्रातील आरोपांची चौकशी करा ; माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची मागणी Reviewed by ANN news network on May 13, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.