महापालिका प्रशासनाच्या दंडेलीमुळे व्यापारी संतप्त!; पिंपरी कॅम्प बाजारपेठ 3 तास बंद

महापालिका प्रशासनाच्या दंडेलीमुळे व्यापारी संतप्त! पिंपरी कॅम्प बाजारपेठ 3 तास बंद पिंपरी : प्लॅस्टिक निर्मूलन मोहिमेच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी दुकानांमध्ये महापालिकेचे अधिकारी दंडेली करून घुसत आहेत, तसेच अत्यंत अरेरावी करून दंड वसूल करत आहेत असा आरोप करत बुधवारी पिंपरी कॅम्पमधील व्यापार्‍यांनी या कारवाईच्या निषेधार्थ बंदचे हत्यार उपसले.दुपारी 12 ते 3 या काळात पिंपरी कॅम्पमधील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. व्यापारी संतप्त झाल्याचे कळताच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी व्यापार्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांना पिंपरी कॅम्पमध्ये पाठवून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अधिकारी अरेरावी करत असल्याचा आरोप बुधवारी सकाळी पालिकेच्या प्लॅस्टिकविरोधी पथकाने पिंपरी कॅम्पमध्ये कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, या पथकात असलेले उपनिरिक्षक आणि सुरक्षा कर्मचारी व्यापार्‍यांशी बोलताना अत्यंत उद्धट्पणे बोलत होते, दमदाटी करत होते असा आरोप व्यापार्‍यांनी माध्यमांशी बोलताना केला. बाजारात विष मिळते येथील पवन ड्रायफ्रूटमध्ये सकाळीच पथकाने कारवाई केली. त्यावेळी दुकानाच्या मालकांनी आत्ताच दुकान उघडले आहे. लगेच 5 हजार रुपये आणायचे कुठून असा प्रश्न विचारला असता, त्या पथकातील उपनिरिक्षकाने बाजारात विष मिळते असे उत्तर उर्मटपणे देऊन आत्महत्या करा असे अप्रत्यक्ष पणे सुचविल्याचे त्या दुकानाच्या मालकाने माध्यमांशी बोलताना सांगितले. सहायक आयुक्त घोडकेंनी केली सारवासारव पथकातील अधिकार्‍यांच्या या उर्मटपणामुळे वैतागलेल्या व्यापार्‍यांनी एकत्र येत या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बाजारपेठ बंद केली. यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. आयुक्त राजेश पाटील यांनी सारवासारव करण्यासाठी सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांना तेथे पाठविले. त्यावेळी व्यापार्‍यांनी त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितलीे. पालिकेच्या पथकातील अधिकार्‍यांच्या अरेरावीचे मासलेवाईक किस्से ऐकून अवाक झालेल्या घोडके यांनी पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना नीट वागण्याची समज दिली जाईल असे आश्वासन माध्यम प्रतिनिधींसमोर व्यापार्‍यांना दिले.तसेच नागरिकांनी कापडी पिशव्या वापराव्यात असा सल्लाही त्यांनी दिला. महापालिकेच्या पथकातील अधिकारी 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी असल्याचे सांगत आहेत. तर, व्यापार्‍यांचे म्हणणे 51 मायक्रॉनच्या पिशव्या वापरण्यास परवानगी आहे असे आहे. वेगवेगळ्या रकमेची दंड आकारणी? याशिवाय पथकाने काही ठिकाणी 2 तर काही ठिकाणी 5 हजार रुपये दंडाच्या पावत्या फाडल्या असल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला आहे. यामुळे एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या दंडाच्या रकमा कशा आकारल्या जात आहेत असाही सवाल व्यापारीवर्गाने केला आहे. दुकानात घुसून दहशत? शिवाय पथकातील 10ते 12 जण एकाचवेळी दुकानात घुसून दहशत निर्माण करतात,अरेरावीची भाषा वापरत अंगावर धावून येतात, पंचनामा न करताच जबरदस्तीने दंडाची पावती करतात असा आरोपही व्यापार्‍यांनी केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या दंडेलीमुळे व्यापारी संतप्त!; पिंपरी कॅम्प बाजारपेठ 3 तास बंद महापालिका प्रशासनाच्या दंडेलीमुळे व्यापारी संतप्त!;  पिंपरी कॅम्प बाजारपेठ 3 तास बंद Reviewed by ANN news network on May 19, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.