Video : पिंपरी चिंचवड पालिकेवर हंडा मोर्चा

पिंपरी : चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी पाणी प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी पालिकेच्या इनगेटवर महिलांसह हंडा मोर्चा प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता रामनाथ टकले आणि उपअभियंता शहाजी गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि यावर लवकर तोडगा काढण्याविषयी सांगितले. पण विकास साने यांनी जोपर्यंत लेखी स्वरूपात आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही येथेच बसून राहणार असल्याचे सांगितले. आंदोलनकर्त्यांनी आम्हांला पाणी फक्त अजून 1 ते 2 तास वाढवून द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर प्रशासक आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यासाठी आंदोलक विकास साने आणि पाच कार्यकर्ते अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ याना निवेदन देण्यात आले, अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन आम्हांला पाण्याची वेळ वाढवून देण्याची विनंती केली.
Video : पिंपरी चिंचवड पालिकेवर हंडा मोर्चा Video : पिंपरी चिंचवड पालिकेवर हंडा मोर्चा Reviewed by ANN news network on April 29, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.