video : त्रिवेणीनगर येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

तळवडे : त्रिवेणीनगर, तळवडे रोड येथे असलेले कॅनेरा बँकेचे एटीएम जिलेटीनचा स्फोट करून फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी पहाटे 3 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र, या प्रयत्नात चोरट्यांना यश आले नाही. एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्या दोघांनी कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये जिलेटीनचा स्फोट केला. एटीएम फोडण्यासाठी हा स्फोट करण्यात आला मात्र एटीएम मधील रक्कम बाहेर काढणे चोरट्यांना शक्य झाले नाही स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि परिसरातील नागरिक जागे झाले. नागरिक जागे झाल्याची कुणकुण लागताच चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
video : त्रिवेणीनगर येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न video : त्रिवेणीनगर येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न Reviewed by ANN news network on April 21, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.