video : पोलिसआयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली; अंकुश शिंदे नवे पोलिसआयुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली व्ही. आय. पी सुरक्षा, विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर मुंबई येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधार सेवा या पदावर कार्यरत असलेले अंकुश शिंदे यांना आणण्यात आले आहे. मावळते पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे सध्या देशाबाहेर असल्याने त्यांचा कार्यभार अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे होता. त्यांच्याक्डून अंकुश शिंदे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. शिंदे यांची मुरब्बी ते प्रसिद्धी झोतापासून लांब राहणारे अधिकारी म्हणून ओळख आहे. गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी योग्य कारवाई करण्यास अंकुश शिंदे कुचराई करत नसल्याचे समजते.दरम्यान, नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी थोडक्यात संवाद साधला. गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अनेक आयपीएस अधिकार्‍यांचा समावेश आहे. अप्पर पोलिस आयुक्त, सह आयुक्त तसेच काही शहरांच्या आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
video : पोलिसआयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली; अंकुश शिंदे नवे पोलिसआयुक्त video : पोलिसआयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली; अंकुश शिंदे नवे पोलिसआयुक्त Reviewed by ANN news network on April 21, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.