चिंचवडमधील काही भागात पाणीपुरवठा खंडित
पिंपरी-चिंचवड शहरातील मोहन नगर महात्मा फुले नगर राम नगर दत्तनगर विद्या नगर या परिसरात शुक्रवारी पाणी पुरवठा खंडित झाला पाणीपुरवठा करणाऱ्या या मार्गावरील व्हाल खराब झाल्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी संध्याकाळपर्यंत वेळ लागण्याची शक्यता पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तविले होते यावर माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी तातडीने लक्ष घालून आयुक्त राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधा आणि जरुर या परिसराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी विनंती केली आयुक्तांनी ही विनंती मान्य केली आहे दरम्यान पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी आणि काम करणारे ठेकेदार यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे असे मारुती भापकर यांनी सांगितले
video : चिंचवडमधील काही भागात पाणीपुरवठा खंडित
Reviewed by ANN news network
on
April 21, 2022
Rating:

No comments: