चिखली परीसरात लक्ष्मण देवासी या 8 वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. सोमवारी मारवाडी समाज आणि विविध संघटनांनी चिखली पोलीसठाण्यावर मोर्चा काढला. आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत लक्षमणचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका देवासी कुटुंब आणि मोर्चातील सहभागींनी घेतली. चिखली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून आठवडाभरात गुन्हेगारांना गजाआड केल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, एका आरोपीने लक्ष्मणवर लैंगिक अत्याचर करण्याचा प्रयथ केला. मात्र, त्याने विरोध केल्याने त्याने अन्य कोणाला हा प्रकार सांगू नये म्हणून त्याला डोक्यात दगड घालून ठार मारल्याची कबुली अटक केलेल्या एका संशयिताने दिल्याचे वृत्त आहे.
video : 8 वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या
Reviewed by ANN news network
on
April 19, 2022
Rating:

No comments: