पिंपरीत महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला!
पिंपरी :पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील आंबेडकर पुतळ्याजवळ तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गुरुवारी जनसागर उसळला. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी गुरुवार सकाळपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मागील दोन वर्षे कोरोनामुळे आंबेडकर जयंती मोजक्याच पदाधिकाèयांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली होती. तथापि, यंदा शासनाने निर्बंध हटविल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने अभिवादन
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रतिमेस आणि पिंपरी, एच.ए. कॉलनी, व दापोडी येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी समवेत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, राजेश आगळे, मुख्य संयोजक संजय भोसले, ह क्षेत्रिय अधिकारी विजयकुमार थोरात, गणेश भोसले, तुकाराम गायकवाड आदि उपस्थित होते.
युवक काँग्रेस, पिंपरी चिंचवड
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या १०० प्रास्ताविकांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, प्रदेश सचिव अनिकेत अरकडे, सरचिटणीस विशाल कसबे, वासिम शेख, विनिता तिवारी, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, गौरव चौधरी, जिफिन जॉन्सन, मयूर रोकडे आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष, पिंपरी चिंचवड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी पिंपरी चिंचवड भाजपतर्फे अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, प्रदेश महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महपौर राहुल जाधव, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, विजय फुगे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, अनुसूचित.जाती मोर्चा प्रदेश चिटणीस कोमल शिंदे, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष सुभाष सरोदे, महिला आघाडी प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक, शहर उपाध्यक्ष समीर जावळकर, प्रदीप बेंद्रे, ओबीसी आघाडीचे सरचिटणीस कैलास सानप, कोमल काळभोर, सुभाष रणसिंग, युवामोर्चा सरचिटणीस तेजस्विनी कदम, मंडल अध्यक्ष महादेव कवितके, विजय शिनकर, नंदू भोगले, कविता हिंगे, रेखा कडाली, अनिल लोंढे, जयश्री मकवाना, कोमल गौडाळकर, शुभांगी कसबे, राधिका बोर्लीकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी चिंचवड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या घोषपथकाने त्यांना मानवंदना दिली.
भाऊसाहेब तापकीर शाळा, काळेवाडी
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित कै. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उमेश शिंदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी श्रुतीका नवसरे, प्राजक्ता चंदे ,अदिती गरड, अनुष्का भोसले, अंजली सूर्यवंशी व इतर विद्यार्थिनी नमो गौतमा या गाण्यावर नृत्य केले. सार्थक हांडे, श्रुती गोरखे, प्रणिता जगताप, शिवानी शिंदे,अक्षता ढेंगळे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. गायत्री ढेपे, पूनम इथापे, श्रद्धा मोरे, सायली सकटे या विद्यार्थीनी गायन व पेटीवादन केले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी सांस्कृतिक व भीमगीतावर नृत्य केले.
कुदळवाडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अजयंती कुदळवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, संतोष मोरे, भाऊसाहेब रोकडे, गणेश यादव, प्रकाश चौधरी, विजय तापकीर, सुरेश वाळुंज, श्याम थोरात, शरद गोरे ,दिपक घन, गौरव त्रिपाठी,मोईद शेख,वैभव वाघ, प्रकाश चौधरी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडी
दापोडी परिसरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
जनता शिक्षण संस्थेचे सहायक सचिव रामेश्वर होनखांबे, प्राचार्या अंजली घोडके, उपप्राचार्य विठ्ठल कढणे, कनिष्ठ महाविद्यालयचे विभाग प्रमुख विजय बागडे,अनिरुद्ध काळेल, रवींद्र फापाळे,मनोज नारायणकर, जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव हेमंत बगनर यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर बंधूभगिनी यावेळी उपस्थित होते.
अनुसाई ओव्हाळ शाळा, पुनवळे
अनुसाई ओव्हाळ शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती गुरूवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन इ. ९ वी तील विद्यार्थ्यांनी केले. अंकिता दर्शले व भासगे नरसप्पा यांनी सूुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या वेळी गुरुकूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद ओव्हाळ, सचिव विश्वास ओव्हाळ शाळेचे मुख्याध्यापक गणेश गवळी,माजी नगरसेविका रेखा दर्शले, बाळासाहेब दर्शले, नितीन दर्शले,अरूण ओव्हाळ,सागर ओव्हाळ, बाळासाहेब ओव्हाळ, मधूकर ओव्हाळ,सुरेश गायकवाड, दादा मदने,लक्ष्मण मोहिते आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंचाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन खरात यांनी पिंपरी येथील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोसले, दिपक देवडे, साईनाथ कांबळे, बाबासाहेब शिंदे, सुहेब अत्तार, अमोल संकपाळ, सौरभ साळुंके, बाबू माने आदि उपस्थित होते.
ज्ञानप्रभात विद्यामंदिर, सहयोनगर , रुपीनगर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर , रुपीनगरयेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गवळी, संस्थेचे खजिनदार बाळासाहेब सावंत, नीलकंठ लांडगे , अॅड. डूमने , अॅड. पानठवले, अॅड. पुणेकर तसेच ज्ञानप्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञानप्रभात विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे तसेच नृत्य व गाणी सादर केली.
पिंपरीत महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला!
Reviewed by ANN news network
on
April 14, 2022
Rating:

No comments: