बावधन येथील ’त्या’ खुनाचे गूढ उकलले; चौघे अटकेत! हिंजवडी पोलिसांची कामगिरी

पिंपरी : बावधन येथे रविवारी सायंकाळी आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून मृत व्यक्तीचा खून करून मृतदेह पोत्यात भरून नाल्यात फेकणार्याच दोघांसह अन्य दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्तालयात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अपर पोलीस आयुक्तांनी याबद्दल माहिती दिली. राजू दिनानाथ महातो (वय 36, रा. बावधन, पुणे, मुळगाव - खलदार, कोलकत्ता) असे खून झालेल्या या इसमाचे नाव आहे.सुनील मुना चौहान (वय 26, रा. बावधन, मुळगाव बिहार), मुन्ना फुनी चौहान (वय 40), योगेंद्र श्रीगुल्ले राम (वय 40, मुळगाव उत्तर प्रदेश) आणि बलिंदर श्रीगुल्ले राम (वय 36) यांना हिंजवडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. महातो हा आरोपींसोबत बिगारी काम करत असे, त्याचा आरोपी सुनील चौहान याच्याशी वाद झाला. त्यातून सुनील याने गळा आवळून महातो याचा खून केला. इतर आरोपींनी मृतदेह दोरीने बांधून गोणीत भरला व बावधन येथे पुणे मुंबई मार्गालगत असलेल्या नाल्यात फेकून दिला. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली. मृतदेह सापडलेल्या ठिकाणाच्या आजूबाजूस असलेले 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले. यामध्ये दोन व्यक्ती दुचाकीवरून पांढर्याम पोत्यात काहीतरी घेऊन जाताना दिसल्या. या दुचाकीची माहिती घेतली असता तीबावधन येथील एकाची असल्याचे समजले.पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
बावधन येथील ’त्या’ खुनाचे गूढ उकलले; चौघे अटकेत! हिंजवडी पोलिसांची कामगिरी बावधन येथील ’त्या’ खुनाचे गूढ उकलले; चौघे अटकेत! हिंजवडी पोलिसांची कामगिरी Reviewed by ANN news network on April 20, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.