मोशी येथील एस.के.ब्रूम्स या झाडू तयार करणा-या कंपनीला ०७ एप्रिल रोजी रात्री आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड व पुणे महापालिका, पी. एम. आर. डी. ए. , एम. आय. डी. सी. आणि काही खासगी कंपन्याचे अग्निशमन विभाग आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, कंपनीतील शेकडो रसायनांच्या पिंपांनी पेट घेतल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. यात जीवितहानी झाली नाही. मात्र, या परिसरातील नागरिकांना धूर आणि प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे.
मोशी येथील एस.के.ब्रूम्स कंपनीत आग
Reviewed by ANN news network
on
April 08, 2022
Rating:

No comments: