ईडीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी : अ‍ॅड. सचिन भोसले

किरीट सोमय्या यांच्या विरोधात शहर शिवसेनेचे पिंपरीत आंदोलन पिंपरी : ‘आयएनएस विक्रांत’ च्या नावाखाली देशभरातील नागरीकांना भावनीक आवाहन करुन जमा केलेल्या निधीचा हिशोब भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राला द्यावा. ईडीला किंवा केंद्रीय तपास यंत्राणांना भ्रष्टाचाराचा तपासच करायचा असेल तर त्यांनी प्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील मागील पाच वर्षांचा भ्रष्टाचाराचा तपास करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख अ‍ॅड.सचिन भोसले यांनी केली. शुक्रवारी (दि. 8 एप्रिल) पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेने किरीट सोमय्या यांच्या विरोधात पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन केले. यावेळी प्रभारी अशोक वाळके, माजी नगरसेवक अनंत कोर्‍हाळे, राम पात्रे, शहर संघटीका अ‍ॅड. उर्मिला काळभोर, शहर संघटक रोमी संधू, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, अमोल निकम, बाळासाहेब वाल्हेकर, ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, उपजिल्हा संघटीका वैशाली मराठे, शहर प्रसिध्दी प्रमुख भाविक देशमुख, उपशहर प्रमुख तुषार नवले, शैलेश मोरे, पांडुरंग पाटील, सुधाकर नलावडे, हरिश नखाते, सुदेश राक्षे, विभाग प्रमुख नाना काळभोर, राजेश वाबळे, गोरख पाटील, गोरख नवघणे, पंकज दिक्षीत, माऊली जगताप, सय्यद पटेल, प्रदिप दळवी, जिल्हा समन्वयक राहुल भोसले, समन्वयक गणेश आहेर, युवा सेना अधिकारी निलेश हाके तसेच नेताजी काशिद, दादा नरळे, रावसाहेब थोरात, विभाग संघटक भरत इंगळे, विभाग संघटीका कामिनी मिश्रा, शिल्पा अनपण, सुनिता जगदाळे, गौरी घंटे, नंदा सातकर, सरिता साने, उप विभाग प्रमुख सुनिल ओव्हाळ, सुनिल सवाई तसेच कैलास नेवासकर, संतोष वाळके, कृष्णा वाळके, अविनाश लोणारे, शिवाजी कुर्‍हाडकर, गजानन धावडे, सचिन महाजन, भालेराव आदी उपस्थित होते. अ‍ॅड. सचिन भोसले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर सुडबुद्दीने कारवाई केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपाने रचलेले हे षडयंत्र देशातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्रातील शिवसेना ही हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची लढवय्यी सेना आहे. लोकशाहीचा गळा घोटून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असणा-या केंद्र सरकारपुढे शिवसेना आणि महाराष्ट्रातील जनता झुकणार नाही. वेळप्रसंगी जशास तसे उत्तर देऊ. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या मागे सर्व शिवसेना आणि राज्यातील जनता खंबीरपणे उभी आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी केलेल्या फसवेगिरी विरुध्द कडक कारवाई करावी अशीही मागणी अ‍ॅड. सचिन भोसले यांनी केली. यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या मुर्दाबाद, गली गली में शोर है, किरीट सोमय्या चोर है अशा घोषणा दिल्या.
ईडीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी : अ‍ॅड. सचिन भोसले ईडीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी : अ‍ॅड. सचिन भोसले Reviewed by ANN news network on April 08, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.