भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तोडण्यात आलेले शेती पंपाचे वीज कनेक्शन तात्काळ पूर्ववत करावे या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढुन निषेध व्यक्त केला..! कोरोना महामारीमुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबील वसुली व वीज कनेक्शन तोडण्याचे काम या महावसुली सरकारकडून सुरू असून ती तात्काळ थांबविण्यात येऊन शेतकऱ्यांना मागील दोन वर्षाचे शेती पंपाचे वीजबील माफ करावे व ज्या शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांचा तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हाता तोंडाशी आलेलं पीक पाण्याविना वाया जाणार नाही. जर वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत केला नाही तर शेतकऱ्यांचे पीक वाया जाईल या चिंतेने शेतकरी मानसिक व आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेला असून हे जर पीक पाण्याविना जळून गेले तर शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिकच गडद होईल व त्यामधूनच शेतकरी आत्महत्या होण्याच्या दुर्घटना देखील होऊ शकतात त्यामुळे असा अनुचित प्रकार घडू नये व शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्यावाचून वाया जाऊ नये यासाठी तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता सूर्यवंशी साहेब यांच्याकडे करण्यात आली शेतकऱ्यांचे शेती पंपाचे विजकनेक्शन तात्काळ पूर्ववत केले जाईल व ज्या विजबिलामध्ये दुरुस्ती असेल ते दुरुस्त्या करून शेतकऱ्यांना टप्याटप्याने चालु बील भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल हा शब्द दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या विजबील दुरुस्ती व वीज कनेक्शन जोडले नसल्याचे निदर्शनास आल्यास पुढील 8 दिवसांमध्ये आपल्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला..!मा.मंत्री बाळा भेगडे , जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे , तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे , महीला तालुका अध्यक्ष सायली बोत्रे ,प्रदेश किसान संघाचे सचिव संतोष दाभाडे , भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे ,मा.सभापती ज्ञानेश्वर दळवी, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर ,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर ,संततुकाराम साखर कारखाना संचालक शामराव राक्षे, मा. सभापति निवृत्ती शेटे सरचिटणीस सुनील चव्हाण मच्छिंद्र केदारी , जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले युवती आघाडी अध्यक्षा सुवर्णा गायकवाड ,महीला आघाडी कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव , सरचिटणीस कल्याणी ठाकर ,वडगाव शहर अध्यक्षा धनश्री भोंडवे ,शिल्पा दळवी ,वैदवी रणदिवे , सुजाता शेलार , सुवर्णा गाडे, अंजली कडु , अश्विनी तिकोणे ,कविता शिंदे ,सागर शिंदे यांच्यासह शेतकरी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..!
भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा Reviewed by ANN news network on March 02, 2022 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.