सत्ताधारी भाजपच्या मदतीने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने महानगरपालिका लुटली! : भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचा खळबळजनक आरोप
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागाच्यावतीने शहारातील महिलांना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेने सत्ताधारी भाजप व आधिकाèयांच्या संगनमताने महिलांच्या खोट्या सहया करून कोट्यावधी रूपये कमवले आहेत.
महिलांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत या संस्थेने खोटया सहया करून महिलांना प्रशिक्षण दिल्याचे दाखविले आहे. फॉरेन्सिक अहवालामधून या संस्थेने केलेला भ्रष्टाचार उघड झाला आहे; असा आरोप भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी पत्रकारपरिषदेत करून आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बारणे म्हणाल्या नागरवस्ती विभागाच्या वतीने महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आखिल भारतीय संस्थेची नेमणुक केलेली आहे. या संस्थेने महिलांना प्रशिक्षण न देता कोटयांवधी रूपयांचे बील महापालिकेकडून वसूल केले. कोरोनाच्या काळात जमावबंदी असताना तसेच रस्त्यावर चिटपाखरू नसतानाही या संस्थेने तब्बल ६१ हजार १५५ महिलांना प्रशिक्षण दिले आहे.
महापालिकेच्या या भ्रष्टाचाराबावत सप्टेंबर महिन्यांमध्ये विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मला समजले तेव्हापासून या विषयामध्ये सात्यत्याने आधिकारी व आयुक्ताकडे पाठपुरावा करत होते. मात्र आयुक्त व अधिकाèयांने याकडे दुर्लक्ष केले. महासभेमध्ये देखील हा विषय मांडला होता त्यानंतर आयुक्तांकडे याबावत सुनावणीची मागणी केली. मात्र त्यांनी वेळ दिला नाही.
राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तकार केली त्यावर अजितदादांनी आयुक्तांना आखिल भारतीय संस्थेबाबत असलेली सर्व माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र आयक्तांनी करारनामे देत समजुत काढण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे आयुक्त माहिती देत नव्हते.यासंदर्भात आम्ही अजितदादांची परत भेट घेतली त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली व त्यांनी तात्काळ लगेच आयुक्तांना समज देऊन सदरील माहिती लवकरात लवकर देण्याचे सांगितले. आम्हांला महापालिकेतून माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. नागरवस्ती विभागाकडून ज्या महिलांची यादी मिळाली होती त्या महिलांचा आम्ही शोध घेतला. त्यापैकी अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतलेच नसल्याचे सांगितले. तर ज्या महिलांच्या हजेरीपत्रकावर स्वाक्षèया आहेत त्याचे आम्ही फॉरेन्सिक करण्याचा निर्णय घेतला.
दहा महिलांच्या स्वाक्षèया आम्ही फॉरेन्सिक विभागाकडे पाठवल्या होत्या. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्यक्ष महिलांनी केलेल्या स्वाक्षèया आणि हजेरीपत्रकावर असलेल्या स्वाक्षèयांमध्ये तफावत आढळून आली आहे. याचाच अर्थ या सहया बनावट असल्याचे उघड झाले आहे.ज्यावेळी आम्ही आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी या महिलांना भेटलो त्यावेळी महिलांकडून मिळणारी उत्तरे थक्क करणारी होती.
अनेक महिलांनी आमची कागदपत्रे घेऊन जातात, सहया करून घेतात मात्र पुन्हा आमची चौकशीही करत नसल्याचा आरोप केला. तर एका महिलेला हेअर स्पा कोर्सच्या नावाखाली दोन दिवस हात धुण्याचे प्रशिक्षण दिले. मात्र प्रमाणपत्र देत असताना त्यावर ९० दिवस अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केला असल्याचे नमूद केले आहे. उच्चभु घरातील महीलांना कागदोपत्री मोलकरीणीचे प्रशिक्षण दिल्याचे दाखविले आहे. यावरून या संस्थेची बनावटगिरी स्पष्ट होते.अशाप्रकारे या संस्थेने सत्ताधारी भाजप व अधिकाèयांना हाताशी धरून कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. २०२०-२१ या वर्षामध्ये या संस्थेला तब्बल ५७ कोटी रूपयांचे बिल देण्यात आले आहे. मात्र या संस्थेच्या कामाचा आढावा घेतला असता संस्थेने पूर्णता बोगस काम केल्याचे समोर आले आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार असतानाही यावर सत्ताधारी भाजपमधील कोणताही पदाधिकारी बोलत नाही. याचाच अर्थ यामध्ये सत्ताधाèयांसह अधिकाèयांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट आहे. मात्र अशाप्रकारे जनतेच्या पैशाची लूट आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे जोपर्यंत या संस्थेवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहणार आहे.
सत्ताधारी भाजपच्या मदतीने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने महानगरपालिका लुटली! : भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचा खळबळजनक आरोप
Reviewed by ANN news network
on
March 03, 2022
Rating:

No comments: