चिंचवड रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या पत्राशेड मधील दुकानांना आग

चिंचवड: चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पत्राशेड मधील दुकानांना शनिवारी सायंकाळी आग लागली या. आगीमध्ये किमान चार ते पाच दुकाने भस्मसात झाली आहेत. या दुर्घटनेत प्राणहानी झाली नसली तरी दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. आगीचा भडका मोठा उडाला असल्यामुळे अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी अद्यापही आग धुमसत आहे. आगीचे कारण कळू शकलेले नाही
चिंचवड रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या पत्राशेड मधील दुकानांना आग चिंचवड रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या पत्राशेड मधील दुकानांना आग Reviewed by ANN news network on March 05, 2022 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.