अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या राजकीय घडामोडीचा थोडक्यात आढावा (व्हिडिओ)
पिंपरी : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात अनेक राजकी घडामोडी घडल्या. प्रथम कोंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी याचा निषेध केला. आणि या मुद्द्यावर आघाडीतील सर्वपक्ष आंदोलन करतील असा इशारा दिला. त्यानंतर तातडीने भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या निषेधार्थ निदर्शने केली. यावेळी ’देशद्रोही मलिक यांना देशातील जनता माफ़ करणार नाही’; अशी टीका लांडगे यांनी केली. त्यानंतर आघाडीतील तिन्ही पक्षांनी २५ फ़ेब्रुवारी रोजी आंदोलन केले. या सर्व घटनाक्रमाचा हा धावता आढावा.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या राजकीय घडामोडीचा थोडक्यात आढावा (व्हिडिओ)
Reviewed by ANN news network
on
February 25, 2022
Rating:

No comments: