तळेगावातील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले!, चौघे अटकेत!! गुन्हेशाखेच्या युनीट पाचची यशस्वी कामगिरी

तळेगावातील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले!, चौघे अटकेत गुन्हेशाखेच्या युनीट पाचची यशस्वी कामगिरी पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास निर्जन रस्त्यावर संगीता बाळासाहेब भोसले या तरुण विवाहित महिलेचा धारदार चाकूने गळा चिरून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा युनिट पाचने यशस्वीरित्या केला असून या गुन्ह्यातील तीन आरोपींना जेरबंद केले आहे. तर चौथ्या आरोपीस तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी पकडले. याप्रकरणी पोलिसांनी बजरंग मुरलीधर तापडे (वय 45, रा. श्रीनगरी सोसायटी, खांडगे पेट्रोल पंपासमोर तळेगाव दाभाडे, मूळ राहणार बनसारोळा, तालुका केज, जिल्हा बीड, पांडुरंग उर्फ सागर बन्सी हारके (वय 35, रा. संतकृपा कॉलनी, आदर्शनगर, मोशी, मूळ राहणार किल्ले धारूर, जि.बीड) सचिन प्रभाकर थिगळे ( वय 30, गुप्ता हॉस्पिटलजवळ, चिखली, जिल्हा बुलढाणा) सदानंद रामदास तुपकर (वय 26, रा. मोठेखेड, जिल्हा बुलढाणा) यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 302, 120 ब, 34 अन्वये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट पाचचे कर्मचारी करत होते. मृत महिलेशी अनैतिक संबंध असलेल्या व्यक्तीने तिच्या खुनाची सुपारी देऊन तिचा खून घडवून आणला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संगीता भोसले आणि बजरंग तापडे यांच्यात मागील दोन वर्षे अनैतिक संबंध होते. संगीता हिने बजरंग याच्यामागे तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट चालविला होता. परंतु बजरंग विवाहित असल्याने आणि त्याची मुले मोठी असल्याने त्याला तिच्याबरोबर लग्न करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने आपला जवळचा मित्र पांडुरंग हरके याला ही गोष्ट सांगितली आणि त्याला संगीताच्या खुनाची सुपारी दिली. संगीताच्या खुनासाठी सात लाख रुपये रोख देण्याचे बजरंग याने पांडुरंगला कबूल केले त्यातील चार लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिला. पांडुरंग याने त्याचा गुन्हेगारी वृत्तीचा मित्र सचिन थिगळे याला आळंदी येथे बोलावून संगीता भोसलेचा फोटो दाखवला. तिच्या राहण्याचा पत्ता सांगितला. तिचा नेहमी येण्याजाण्याचा मार्ग दाखवला आणि तिच्या खुनासाठी एक लाख रुपये रोख अ‍ॅडव्हान्स सचिन थिगळे याला दिले. सचिन थिगळे आणि त्याचा मित्र सदा उर्फ सँडी यांनी संगीता भोसले हिच्या घराची, वडिलांच्या दुकानाची आणि रस्त्याची टेहळणी करून तिच्या खुनाची योजना आखली. नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संगीता नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांच्या दुकानावर विक्रीसाठी दुधाच्या पिशव्या पोहोचवून स्कुटीवरून घराकडे परत येत असताना आरोपी सचिन थिगळे आणि त्याचा मित्र सदा उर्फ सँडी यांनी इंद्रपुरी कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावर तिची स्कुटी अडवली. तिचे केस मागून पकडून चाकूने तिचा गळा चिरून खून केला आणि तेथून पळ काढला. हा खून नियोजनबद्ध पद्धतीने केलेला असल्यामुळे त्याचा तपास करणे पोलिसांना अवघड जात होते. पोलिसांनी तळेगाव दाभाडे ते चिंबळी सुमारे 60 ते 65 किलोमीटर आरोपींचा माग काढला. त्यांना ताब्यात घेऊन व्यवस्थित चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तळेगावातील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले!, चौघे अटकेत!! गुन्हेशाखेच्या युनीट पाचची यशस्वी कामगिरी तळेगावातील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले!, चौघे अटकेत!!  गुन्हेशाखेच्या युनीट पाचची यशस्वी कामगिरी Reviewed by ANN news network on August 26, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.