स्मार्टसिटीतील स्मार्ट भागात पाण्याची बोंब! पिंपळे सौदागर, रहाटणीत पाणीटंचाई; शत्रुघ्न काटे यांचा जनआंदोलनाचा इशारा
स्मार्टसिटीतील स्मार्ट भागात पाण्याची बोंब!
पिंपळे सौदागर, रहाटणीत पाणीटंचाई; शत्रुघ्न काटे यांचा जनआंदोलनाचा इशारा
पिंपरी : पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरात सध्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आहे.
शहरातील स्मार्ट प्रभाग असलेल्या या भागाला पाणीटंचाईने ग्रासले आहे. येथील बहुतेक सर्व निवासीसंकुलांनाएक दिवसाआड तसेच अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा या भागात होत असून त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. हा प्रश्न एक दोन दिवसात न सुटल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिला आहे. काटे यांच्या या इशार्यामुळे महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
शत्रुघ्न काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. जेव्हापासून पालिकेवर प्रशासनाचे नियंत्रण आले आहे तेव्हापासून या प्रभागात पाणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणी कोणाला वाली उरलेला नाही असे कामकाज आज सुरू आहे. आज प्रत्येक नागरिक या विषयी मला जाब विचारीत आहे. आज स्मार्ट सिटी म्हणून आम्ही मिरवत आहोत पण सत्य परिस्थीती काही वेगळीच आहे. नागरीकांच्या मनात एक जनआक्रोश निर्माण झालेला आहे.
या नागरीकांचा प्रतिनिधी म्हणून मी विनंती करीत आहे की, येत्या एक दोन दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही तर मला लोकशाही पद्धतीने या विरोधात जनआंदोलन करण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही, असे काटे यांनी आयुक्तांना निवेदनातून ठणकावले आहे.
स्मार्टसिटीतील स्मार्ट भागात पाण्याची बोंब! पिंपळे सौदागर, रहाटणीत पाणीटंचाई; शत्रुघ्न काटे यांचा जनआंदोलनाचा इशारा
Reviewed by ANN news network
on
April 24, 2022
Rating:

No comments: