देशद्रोही प्रवृत्तींना भर चौकात फाशी दिली पाहिजे : आमदार महेश लांडगे

पिंपरी : महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यापासून वारंवार नवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेला आरोप हा अत्यंत संतापजनक आहे. मुंबईतील बॉम्ब स्फोटात हस्तक्षेप असलेल्या लोकांसोबत अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तीला अटक झाली. त्याचे कदापि समर्थन होवू शकत नाही. अशा देशद्रोही प्रवृत्तींना भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी टीका भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्यावर 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टर माईंड अंडरवर्ल्ड दाऊद इब्राईम यांच्याशी संबंधित लोकांसोबत जमीन खरेदी व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करीत पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने निदर्शने केली. अशी मागणी करीत राज्यभर निदर्शने केली जात आहेत. यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, दक्षिण भारत आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, शहर चिटणीस दत्ता गव्हाणे, नगरसेविका आरती चोंधे, सुजाता पलांडे, शर्मिला बाबर, उषा मुंडे, सुरेश भोईर, निर्मला कुटे, सागर अंगोळकर, राजेंद्र लांडगे, नम्रता लोंढे, सोनाली गव्हाणे, माधवी राजापुरे, राजेंद्र लांडगे, सागर गवळी, संतोष लोंढे, सविता खुळे, योगिता नागरगोजे, निता पाडाळे, कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, हेमंत देवकुळे, तेजस्विनी कदम, कोमल शिंदे, नंदू भोगले, अजित कुलथे, विक्रांत गंगावणे, सहकार आघाडी अध्यक्ष प्रदीप बेंद्रे, अजय पाताडे, फारूक इनामदार, रवींद्र देशपांडे, सचिन कुलकर्णी,संजय पटनी, देवदत्त लांडे, दिनेश यादव, सुभाष सरोदे, मुक्ता गोसावी, विनोद मालू, संजय परळीकर, सुरेश गादीया, गणेश ढाकणे, गणेश वाळुंजकर, किरण पाटील, आशा काळे, गीता महेंद्र, वैशाली खाडये, संदीप नखाते, बिभीषण चौधरी, शोभा भराडे, सतपाल गोयल, मुकेश चुडासमा, कुणाल लांडगे, सुनील लांडगे, मनोज तोरडमल, योगेश आकुलवार, शिवराज लांडगे, कैलास सानप आदी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले की, चुकीचे आरोप लावून भाजपाच्या नगरसेवकाला अटक झाली की, लगेच राष्ट्रवादीचे स्थानिक नेते पत्रकार परिषद घेवून भाजपावर टीका करतात. आता देशद्रोही आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राईम सोबत संबंध असलेला मंत्री नवाब मलिक याच्या अटकेवर त्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरतात. त्यांना पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आमचा प्रश्न आहे की, मुंबईला दहशतवादाच्या विळख्यात सोडून देश सोडून पळून गेलेल्या माणसाला मदत करणार्‍याचे तुम्ही समर्थन करणार आहात काय?
देशद्रोही प्रवृत्तींना भर चौकात फाशी दिली पाहिजे : आमदार महेश लांडगे देशद्रोही प्रवृत्तींना भर चौकात फाशी दिली पाहिजे : आमदार महेश लांडगे Reviewed by ANN news network on February 25, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.