पिंपरी : महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून स्वावलंबी होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा फायदा घेऊन गोर-गरीब, विधवा व निराधार महिलांना या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन दै. केसरीचे मुख्य वार्ताहर व पिंपरी चिंचवड विभागाचे प्रमुख विजय भोसले यांनी नुकतेच येथे केले.
केंद्रीय श्रम रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असंघटीत महिलांसाठी रोजगार आणि प्रशिक्षण विभागाचे गेले तीन दिवस पिंपरी बौद्ध नगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 75 ते 80 महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. यावेळी पुणे विभागाचे संघटक शिक्षक सुधाकर राम फुले त्त्याचबरोबर पुणे विभागाचे विभागीय संचालक ए.बी. शिवणकर उपस्थित होते. कोरोनामुळे सर्वसामान्य वर्ग दोन वर्षात आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त बेरोजगार झाला आहे. अशातच झोपडपट्यांमध्ये काम करणार्या महिला धुणी-भांडी करण्याचे काम करत असताना कोरोनामुळे त्यांच्या कामावरही कुर्हाड कोसळल्यामुळे त्याचबरोबर घरातल्या प्रमुख व्यक्तीचे काम गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली. अशातच राज्य सरकारच्या काही चांगल्या योजना आहेत. त्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे असे आवाहन भोसले यांनी केले. सुधाकर फुले सारखे सामाजिक जाणीव असणारे संघटक समाजातील दलित वर्गासाठी चांगले काम करत असून त्यांनी अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची संधी दिली असून गेल्या 5 ते 10 वर्षात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांनी मोठे काम केले आहे. असे सांगून भोसले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत दरवर्षी सुमारे 45 कोटीचे अंदाजपत्रक असून या विभागामार्फत महिलांसाठी विविध प्रशिक्षण त्याचबरोबर व्यवसायासाठी बँकांमार्फत अनूदान, कर्ज दिले जाते. कित्येक महिलांनी रिक्षा त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या बनविण्याचे लघुउद्योग सुरु करण्याचे काम केले आहे याचाही आपण फायदा घेतला तर निश्चितच स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाला हातभार लावाल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या चार दिवसाच्य प्रशिक्षण वर्गात सुधाकर फुले यांनी विविध योजनांची माहिती देऊन महिलांचे सक्षमीकरण कसे होईल त्यासाठी काय केले पाहिजे. याची विविध माहिती देऊन महिलांना प्रोत्साहीत केले. याचा लाभ घेतला तर निश्चितच आपल्यामध्ये परिवर्तन होऊन आपण आपल्या कुटुंबाला हातभार लावाल असा विश्वास फुले यांनी व्यक्त केला. तर संचालक शिवशंकर यांनी बचत बँकेची माहिती देऊन ही उद्योग करण्याची महिलांना संधी आहे, त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा : विजय भोसले
Reviewed by ANN news network
on
November 28, 2021
Rating:
No comments: