पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेत स्मार्टसिटी प्रकल्पातील गैरव्यवहाराला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविली.
भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी स्मार्टसिटी प्रकल्पात 250 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या कामाला तांत्रिक मान्यता घेतली नसल्याचे सावळे यांचे म्हणणे होते. सभा सुरू होण्यापूर्वीच या विषयाला तोंड फुटले आणि स्मार्टसिटीच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या सर्व नगरसेवकांनी प्रशासनावर तोंडसुख घेतले.
250 कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मान्यता घेतली नाही. सल्लागार, अधिकारी यांनी मिळून हा भ्रष्टाचार केला आहे. त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली. या भ्रष्टाचारात पालिकेबाहेरील ससत्ताकेंद्रे असललेले राजकारणीही सहभागी आहेत. असा हल्लाबोल सत्ताधारी नगरसेवकांनी केला. तसेच
फक्त स्मार्टसिटीतील भ्रष्टाचारावर सुमारे पाच तास चर्चा झाली. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास विषयपत्रिकेवर असलेले विषय सुरू झाले होते.
भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांनी शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील प्रत्येक प्रभागांत महिला पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी उत्तर दिले. पण, आयुक्तांच्या उत्तरावर सर्व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. महिला सुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. मात्र, नगरसेविकेचे या बाबतचे निवेदन ऐकून घेण्याऐवजी आयुक्त करतो, पाहतो, असे बेजबादारपणाचे उत्तर देतात, हे अशोभनीय आहे, अशी टीका भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्वर थोरात यांनी केली. मला आयुक्तांशी बोलताना, त्यांना फोन करताना भीती वाटते, शहरातील महिलांप्रमाणे मलाही तुरुंगात टाकतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला रस्त्याच्या खोदकामाची माहिती नाही, आपल्या प्रभागात नक्की कशासाठी खोदकाम केले आहे हे संबंधित नगरसेवकाला माहिती नाही. कोणालाही न सांगता, कोणतेही नियोजन न करता रस्ते खोदले जात आहेत. हा मोठा भ्रष्टाचार आहे.
भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, स्मार्ट सिटीत दिवसाढवळ्या, राजरोसपणे पैशावर दरोडा टाकला जात आहे. शरद पवार साहेबांनी भाजपच्या आमदारावर टीका करताना या आमदारांनी दुकान नव्हे तर मॉलच थाटल्याचा आरोप केला होता. या मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही तीन ते चार दुकाने आहेत. असे सांगत याकडे सभेला हजर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे लक्ष्य वेधले.
नगरसेविका सीमा सावळे यांनी यावेळी बोलताना आयुक्तावर यथेच्छ तोंडसुख घेतले. आम्ही चोऱ्या करत नाही, सेटलमेंट करत नाही, आम्ही तुमच्याकडे कोणती कामे घेऊन येत नाही, आम्ही भ्रष्टाचारावर बोलतो. तुम्ही प्रामाणिक अधिकरी आहात, गरिबीतून वर आला आहात, ताई मी कलेक्टर व्हायनू, हे पुस्तक तुम्ही लिहले आहे, या पुस्तकाशी प्रामाणिक राहून या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची हिम्मत दाखवा. त्यांनतर भ्रष्ट राजकारण्यांवर कारवाई करा, अशी मागणी नगरसेविका साळवे यांनी केली.
चौकट
खासदार कोल्हे यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी ऍक्शन मोडवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे या बैठकीचे कामकाज पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ऍक्शन मोडमध्ये होते. सर्वांनीच सत्ताधारी भाजपच्या आणि पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.
स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
Reviewed by ANN news network
on
November 18, 2021
Rating:
No comments: