’माझी स्वाक्षरी, माझा अभिमान’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी : जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त चिखली, मोशी येथे घेण्यात आलेल्या ‘माझी स्वाक्षरी माझा अभिमानजागर मराठीचा’ उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भाजपा शहराध्यक्ष,आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एकाच व्यक्तीला मराठीमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या स्वाक्षरी काढून देण्यात आल्या. यावेळी मराठी स्वाक्षरी शिकवण्याचा अभिनव उपक्रम शिक्षक गोपाळ वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी कामगार नेता सचिन लांडगे, नगरसेविका सारिका बोर्हा डे, स्वीकृत नगरसदस्य सागर हिंगणे, चिखली, मोशी हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, नितीन बोर्हा डे, सोनम जांभूळकर, मंगेश हिंगणे, सागर हिंगणे, जितू बोराटे, अतुल बोराटे, रविंद्र जांभूळकर, सतीश जरे, राजेश सस्ते, संदेश आल्हाट आदी उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी अनेक सोसायटीतील नागरिक एकत्रित आले. माझी स्वाक्षरी;माझा अभिमान या उपक्रमात अभिनेत्री मानसी नाईक सुद्धा सहभागी झाली. मराठी भाषेत एकाच व्यक्तीच्या 4 प्रकारच्या लफ्फेदार स्वाक्षर्याी हस्ताक्षरकार गोपाळ वाकोडे यांच्याकडून तयार करून घेतल्या. यापूर्वी आम्ही आमची स्वाक्षरी इंग्रजी भाषेत करत होतो. मात्र, यापुढे आम्ही आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेतच आपली स्वाक्षरी करू असा संकल्प यावेळी नागरिकांनी केला आहे.
’माझी स्वाक्षरी, माझा अभिमान’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by ANN news network
on
February 28, 2022
Rating:

No comments: