पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेता राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी बुधवारी उत्तम स्थितीतील रस्त्यांवर महापालिका १०० कोटी रुपये उधळणार असल्याचा आरोप केला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी माध्यम प्रतिनिधींना नेऊन वस्तुस्थितीही दाखविली होती. त्यानंतर विविधमाध्यमांनी या प्रकरणाला चांगलीच प्रसिद्धी दिल्यामुळे गडबडलेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी उसने अवसान आणून या प्रकरणी खुलासा करून आपली बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, सांगवी- किवळे ४५ व ३०मी. रूंदीचा बीआरटीएसरस्ताविकास आराखड्याच्या प्रमाणे विकसित करताना सात पॅकेजेमध्ये सन. २००७ साली निविदा काढून केलेले आहे. जगताप डेअरी ते किवळे मुकाई चौक रस्त्यांची विकसनाची /डांबरीकरण करण्याची कामे २०१२ साली पूर्ण झालेली आहेत. डांबरी रस्त्याचा दोष दायीत्व कालावधी ३ वर्षे इतका असूुन सुमारे ९ ते १० वर्षे इतका कालावधी काम पूर्ण होऊन झाला आहे व तेव्हापासून या रस्त्यावर पदपथ सेवा रस्त्यांमधून विविध सेवावाहिन्यांच्या केबल्स, गॅस पाईपलाईन, पाण्याच्या लाईन्स, ड्रेनेज वाहिन्या, डिफेन्स विभागाची केबल, महाजनको महापारेषणची केबल्स इत्यादीमुळे सेवा रस्ता व पदपथाची अनेकदा खोदाई केल्यामुळे नादुरुस्त/खराब झालेला आहे.
तसेच या रस्त्यावरील जगताप डेअरी साई चौक ते डांगे चौक यादरम्यान तीन उड्डाणपूल व तीन सबवे च्या बांधकामांमुळे सेवा रस्ता व पदपथ पूर्णतः खराब झालेला आहे. सदरचा भाग हा दाट लोक वस्तीचा भाग असून खराब झालेले सेवारस्ते व पदपथांची कामे करणे आवश्यक आहे. सांगवी किवळे रस्त्याचे डांबरीकरणाचा वरचा थर खराब झाला असून अनेक ठिकाणी त्याची रायडींग क्वालिटी खराब झाली आहे. त्याची रफनेस टेस्ट केलेली आहे व चाचणी नुसार या रस्त्याचा रफनेस इंडेक्स आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यामुळे त्याचे सध्यस्थितीत डांबरीकरण करणे आवश्यक आहे. सांगवी किवळे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन सुमारे दहा वर्षाचा कालावधी झालेला आहे. डांबरीकरण कामाचा दोष दायित्व कालावधी तीन वर्ष पूर्ण होऊन त्यावर सहा ते सात वर्ष झालेली आहेत. त्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी नादुरुस्त खराब झालेला आहे. आयुक्त यांनी शहर अभियंता (बीआरटीएस) व इतर अधिका-यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे त्यानुसार सदर रस्त्यांच्या पदपथ बांधणी व डांबरीकरण करणे या कामाच्या निविदा मनपाने प्रसिद्ध केलेल्या आहेत व कार्यवाही चालू आहे. दि.२० जानेवारी २०२२ रोजी विविध दैनिक वृत्तपत्रात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाकडून सदरचा खुलासा करणेत येत आहे.
महापालिका म्हणते ‘तो’ रस्ता खराबच! त्यावर खर्च केलाच पाहिजे!!
Reviewed by ANN news network
on
January 20, 2022
Rating:
No comments: