पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचे आयएएस होण्यापूर्वीपासून ते आयएएस होईपर्यँतचा आपला संघर्षमय प्रवास त्यांनी "ताई मी कलेक्टर व्हयनू" या आपल्या आत्मकथनपर पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरुणांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचा हा संघर्षमय प्रवास इतरही अनेक भाषात भाषांतरीत झाला आहे.
या पुस्तकानंतर नुकत्याच नाशिक येथे झालेल्या साहित्य त्यांचे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ओडिसा मध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आलेले अनुभव या पुस्तकात त्यांनी लिहिले आहेत.” मोर ओडिशा डायरी”असे या पुस्तकाचे नाव आहे.
ही डायरी आहे एका तरुण आयएएस अधिकाऱ्याची. ओडिशासारख्या आव्हानात्मक राज्यात त्याने केलेल्या कामांची.
प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत एक तरुण आयएएस होतो.
ओडिशारख्या पूर्ण अनोळखी, मागास मानल्या जाणाऱ्या राज्यात काम सुरू करतो. अधिकारी म्हणून तो तिथे कसा घडत जातो, तिथल्या आदिवासीबहुल-नक्षलग्रस्त भागांत काम करताना त्याला कोणते अनुभव येतात, रोज समोर येणारी आव्हानं तो कशी पेलतो याची गोष्ट म्हणजे मोर ओडिशा डायरी.
सनदी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पाटील यांचे हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरेल. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचल्यास त्यांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल.आपल्या सर्वोच्च अधिकाऱ्याची जडणघडण नेमकी कशी झाली आहे
याची कल्पना येईल.
समकालीन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याची किंमत दोनशे पन्नास रुपये आहे. 9922433606 या क्रमांकावर संपर्क साधून वाचकांना हे पुस्तक मागवता येईल.
नाशिक येथील साहित्य संमेलनात पिंपरी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचे दुसरे पुस्तक प्रकाशित
Reviewed by ANN news network
on
December 07, 2021
Rating:

No comments: